ओवी गाते पांडुरंगा

 •  

   

   

   

   

  ओवी गाते पांडुरंगा

  करे तुझी आराधना

  सदा राहू दे तू कृपा

  आले तुला शरण।।१।।

  देई तुझी छत्रछाया

  संकटी आधार मला

  मनी नित्य तुझा धावा

  रहा सदा सोबती।।२।।

  तूच कर्ता तूच दाता

  साऱ्या जगाचा विधाता

  वसशी तूच सदा

  मनाच्या देव्हाऱ्यात।।३।।

  वंदिते तुझे चरण

  करी तुझेच स्मरण

  हर्षेते अंतकरण

  लाभते मनःशांती।।४।।

  तुझे रुप चित्ती दिसे

  तूच ठाई ठाई वसे

  ओढ मज तुझी लागे

  देगा दर्शन देवा।।५।।

                              मधु.......