खेळ मांडला कवितेचा

 • खेळ मांडला
  भावनांनी कवितेचा
  मनास स्फुरणाऱ्या
  अलवार शब्दांचा...

  मनातील भावनांचे
  रंग-तरंग सजुनी
  कविता बनते
  शब्द मोती गुंफनी...

  सुखदुःखाचे भाव
  अचूक टिपुनी
  कविता दाखवे
  मन उलगडूनी...

  अंतरीचे मन
  बोले कवितेतूनी
  भावनांना करी
  मुक्त बंधनातूनी...

  कवितेच्या खेळाचा
  रोज रंगे डाव
  कविता घेई मनाचा
  क्षणोक्षणी ठाव...

  भाव मनाचे
  उतरे पानावरी
  भावनांची लेखणी
  चाले भराभरी...

  मनी छंद जडला
  कवितेच्या खेळाचा
  शांत करण्या मनास
  खेळ मांडला कवितेचा...

                                मधु......