मधु....

">

बाप व्हावे लागले...

 • बाप व्हावे लागले...

   

  आभाळाची माया

  वडिलांची छत्रछाया

  पाठीशी उभा सदा

  वडीलांचा वटवृक्ष असावा...

   

  कठोरपण वडिलांचे

  आत फणसाचे गरे

  वरुनी रुक्ष वाटे

  आत ममता पाझरे...

   

  सदा शिकवी वडील

  कडक शिस्तीचे धडे

  चुकता बघा मुलांचे

  त्यांचा मारही पडे..‌.

   

  संस्कारांचे बाळकडू

  वडिलांकडून मिळे

  मार्गदर्शनाने त्यांच्या

  संकटांची भीती दूर पळे...

   

  अपार कष्ट करूनी

  शिक्षण आम्हां दिले

  जीवन पथावर चालण्यास

  आत्मविश्वासाचे बळ दिले...

   

  स्वप्नांना स्वावलंबनाचे

  पंख वडीलांनी लाविले

  स्वतंत्र मारण्या भरारी

  अनंत आकाश निर्मिले...

   

  नियतीचे घाव वडिलांनी

  मूकपणाने सोसले

  घरासाठी संकटांशी

  एकटेच ते लढले...

   

  सर्वांच्या आनंदासाठी

  सदा वडील झिजले

  वेदनांचे लवलेशही

  मुखावर न दिसले...

   

  कणखर स्वभावा मागचे

  सत्य आज गवसले

  अनुभवण्या वडिलांचे दुःख

  बाप व्हावे लागले...

   

                          मधु....