मायेची सावली... आई

 • मातृदिनानिमित्त एक छोटीशी रचना आईला समर्पित

  मायेची सावली... आई

  आईच्या कुशीत 
  मायेच्या उशीत
  झोप किती छान लागते 
  आईविना ना करमते..... 

  हात तुझा डोक्यावरील 
  प्रेमाचे अनुभूती देई 
  तुझ्या स्पर्शाच्या थापेने
  विश्वासाने उर भरून येई.....

  तुझ्या सहवासात आई 
  मी प्रेमाचे झोके घेतो 
  प्रेमामध्ये तुझ्या रोज
  मी चिंब चिंब न्हातो.....

  संकटातून तारते तू
  बनुनी ढाल माझी 
  सोबतीत तुझ्या आई 
  नाही कशाची काळजी.....

  रागामध्ये तुझ्या आई 
  प्रेम लपले असते 
  चिडते जेव्हा माझ्यावरी तू 
  स्वतःच मनात झुरते.....

  नयनातील अश्रू माझे 
  तुझ्या हृदयाचे पाणी करता 
  प्रेमळ फुंकर मारता तू 
  घाव माझे भरता....‌

  तुझ्या संस्कारांच्या छायेत 
  जीवन माझे घडले 
  आई तुझ्या आशीर्वादाने 
  शिखरे यशाचे चढले..... 

  आई तुझ्या रूपाने मज 
  प्रेमाचे भांडार मिळाले 
  चरणी तुझ्या आई मी 
  सर्व सुख अनुभवले.....

                                    मधु....