प्रेम वेडी राधा

 • कृष्णाची बासरी

  सुमधुर धून गाई

  राधा बावरी

  मंत्रमुग्ध होई ...

   

  भेटण्या श्रीहरी

  जाई यमुनातीरी

  छेडताच गोपिका

  राधा होई लाजरी ‌...

   

  ओढ प्रेम भेटीची

  राधेस अधिर करी

  दर्शनाने श्रीहरीच्या

  हर्ष दाटे उरी ...

   

  राधा मनी वसे

  श्रीहरीची छबी

  सावळ्या रुपाची

  मनमोहन कांती ...

   

  रासलीला रंगे

  कृष्ण राधेची

  जगी अजरामर

  कीर्ती प्रेमाची ...

                         मधु......